Jayakwadi Water Storage information, Jayakwadi Water Dam <br /><br />८ दिवसांपासून नाशिक, औरंगाबादेत पाऊस सुरु आहे.त्यामुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात २० टक्क्यांनी वाढ झालीय. आज धरणाचा पाणीसाठा ५७.४५ टक्क्यांवर पोहोचलाय. विशेष म्हणजे जुलै महिन्यातच जायकवाडीचा पाणीसाठा ५० टक्क्यांवर पोहचल्यानं वर्षभराची चिंता दूर झाली. ८ जुलै रोजी जायकवाडी धरणात ३७.८७ टक्के इतका पाणीसाठा होता. मात्र, त्यात २० टक्क्यांनी वाढ होऊन धरणाचा पाणीसाठा ५७.४७ टक्क्यांवर पोहोचलाय. आज घडीला जायकवाडी धरणात सध्या ४७ हजार ९७० क्युसेक इतकी पाण्याची आवक सुरू आहे.<br /><br />
